इराण–इस्रायल युद्धाचा परिणाम आता महाराष्ट्राच्या अर्थचक्रावर दिसू लागला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार साखळी विस्कळीत झाल्यामुळे राज्यातील शेती आणि बाजारपेठांवर मोठा परिणाम झाला आहे.
निर्यात थांबल्यामुळे नवी मुंबईतील वाशी APMC मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर १० ते १५ रुपयांनी घसरले आहेत. शिमला मिरची, काकडी आणि कोबी यांसारख्या भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. मात्र, यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
दरम्यान, Shiv Sena (UBT) खासदार Priyanka Chaturvedi आणि Congress नेते Vijay Wadettiwar यांनी LPG दरवाढ आणि गॅस तुटवड्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.
युद्धामुळे विमानभाड्यातही वाढ झाल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे. युद्ध लांबल्यास सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अशाच International News, Maharashtra Economy News, Market Updates साठी Subscribe करा Asianet News Marathi.
#IsraelIranWar #MaharashtraNews #PriceHike #AsianetNewsMarathi